इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनंतर हमासकडून ही पुष्टी करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत सक्रिय असलेल्या हमास (hamas )या इस्लामिक गटाचा प्रमुख इस्माईल हानिया ( Ismail Haniyeh) याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या करण्यात आली आहे. हमासने याला दुजोरा देणारे निवेदन जारी केले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनंतर हमासकडून ही पुष्टी करण्यात आली आहे.
या हल्ल्यात इस्माईल हनियाचा सुरक्षा रक्षकही मारला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्माईल हानियावर तेहरानमधील त्याच्या घरी हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात इस्माईल हनियासह एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला.
इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. IRGC ने एक निवेदन जारी करून इस्माईल हनियाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. पॅलेस्टाईनच्या जनतेला पाठिंबाही व्यक्त केला. हमासने जारी केलेल्या निवेदनात इस्माईल हानियाच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आह
यासोबत हमासने इस्रायलवर हानियाच्या हत्येचा आरोप केला आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. याआधी मंगळवारी इस्माईल हानिया इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिथे त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याचीही भेट घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App