वृत्तसंस्था
नवी दिल्ली : छत्तीसगड केडरचे ज्येष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची भारताची गुप्तचर संस्था RAW (संशोधन आणि विश्लेषण विंग) चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे RAW प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे, त्यानंतर रवी पदभार स्वीकारतील.IPS Ravi Sinha, the new RAW chief, will take charge on June 30, for a two-year tenure
1988 बॅचचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा हे दोन वर्षे या पदावर राहणार आहेत. सध्या ते कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत.
बिहारचे आहेत आयपीएस रवी
रवी सिन्हा हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहेत. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. रवी यांनी 1988 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी म्हणून त्यांना मध्य प्रदेश केडर मिळाले होते.
सन 2000 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल भाग विभागून छत्तीसगड राज्याची स्थापना केली. त्यानंतर सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड केडरमध्ये रुजू झाले. रिपोर्ट्सनुसार, आयपीएस रवी सिन्हा यांना ‘ऑपरेशन मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. ते गुप्तपणे काम करण्यासाठी ओळखले जातात.
रवी यांनी जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्यांतही केले काम
रवी सिन्हा हे भारताच्या शेजारी देशांच्या बाबतीत तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्येही काम केले आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तसेच देशाच्या इतर भागांतही त्यांची नियुक्ती झाली आहे.
ते दोन दशकांहून अधिक काळ RAW मध्ये क्रमांक दोनवर कार्यरत आहेत. ते सध्या RAW च्या ऑपरेशन्स विंगचे प्रमुख आहेत. गुप्तचर माहिती गोळा करण्यात आधुनिक तंत्रे आणण्याचे श्रेय सिन्हा यांना जाते.
सिन्हा यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा पाकिस्तान राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहे, परदेशातून शीख अतिरेक्यांना खतपाणी घातले जात आहे आणि ईशान्येत विशेषतः मणिपूरमध्ये हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
सध्याच्या RAW प्रमुखांची कामगिरी
सध्याचे RAW प्रमुख सामंत गोयल पंजाब केडरचे आयपीएस आहेत. जून 2019 मध्ये त्यांची रॉ चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अनिल धसमना यांची जागा घेतली होती.
या पदावर असताना सामंत गोयल यांनी अनेक कामगिरी आपल्या नावावर केली. त्यांच्या कार्यकाळात काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले. यासोबतच पाकिस्तानमध्ये बालाकोट एअर स्ट्राईक करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App