Nana Patole Vs Rashmi Shukla : IPS रश्मी शुक्ला यांच्यावर नाना पटोलेंनी ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा


महाराष्ट्रात राजकारण्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटींचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.Nana Patole Vs Rashmi Shukla Nana Patole files defamation suit against IPS Rashmi Shukla for Rs 500 crore


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात राजकारण्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणात माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटींचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.

या प्रकरणातील माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आणि माजी राज्य गुप्तचर प्रमुख रश्मी शुक्ला आणि इतरांविरुद्ध दिवाणी न्यायालयात 500 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगद्वारे संकलित केलेल्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी कायमस्वरूपी मनाई आदेशाची मागणी केली आहे.



याप्रकरणी बुधवारी दिवाणी न्यायाधीश व्ही.बी.गोर यांनी रश्मी शुक्ला आणि इतरांना नोटीस बजावून १२ एप्रिलपूर्वी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत आणि हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त आहेत.

रश्मी शुक्ला यांच्याशिवाय पुणे गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक (तांत्रिक विश्लेषण विभाग) वैशाली चांदगुडे, राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि पुणे आणि नागपूरच्या पोलिस आयुक्तांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि भंडारा जिल्ह्यातील आमदार नाना पटोले यांनी आरोप केला आहे की, मागील महाराष्ट्र सरकारने (भाजप नेतृत्वाखालील) राजकीय हेतूने आपल्या विरोधात कट रचला होता.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष रवी जाधव आणि सचिव वैभव जगताप यांच्यामार्फत गुन्हा दाखल केला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की फोनच्या कथित बेकायदेशीर टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला होता. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील कुलाबा पोलिसांनी भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि त्याआधी पुणे पोलिसांनी फोनच्या कथित बेकायदेशीर टॅपिंगच्या संदर्भात एफआयआर नोंदवला होता.

Nana Patole Vs Rashmi Shukla Nana Patole files defamation suit against IPS Rashmi Shukla for Rs 500 crore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात