वादानंतरही आदिपुरूष चित्रपट 300 कोटी क्लबमध्ये, मुंबईत शो बंद पाडला, छत्तीसगडमध्ये थिएटरसमोर हनुमान चालिसा पठण

प्रतिनिधी

मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनन अभिनित आदिपुरुष चित्रपटाबाबतचा वाद सुरूच आहे. एकिकडे हा वाद असतानाच दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रोज नवनवीन विक्रम रचत असल्याचे समोर येत आहे. पहिल्या दोन दिवशी वर्ल्डवाइड 140 कोटी आणि 100 कोटींची कमाई केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने 100 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडला 340 कोटींची वर्ल्डवाईड कमाई करत चित्रपटाने इतिहास रचला आहे.Despite controversy, Adipurush film in 300 crore club, shows canceled in Mumbai, Hanuman Chalisa chanted in front of theaters in Chhattisgarh

दरम्यान, मुंबईतील नालासोपारा येथे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चित्रपटाचा शो बंद पाडला. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये घोषणाबाजी करत प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यानंतर शो रद्द करण्यात आला.



छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये रविवारी संध्याकाळी हिंदूत्ववादी संघटनांनी रॅली काढली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मॉलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंगही केले होते, मात्र ते तोडून कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये प्रवेश केला. नंतर सभागृहासमोर बसून हनुमान चालिसाचे पठण केले. पोलिसांनी त्यांना अटक करून तिथून काढले.

चित्रपट निर्माते बॅकफूटवर, वादग्रस्त संवाद काढणार

चित्रपट निर्मात्यांनी वादग्रस्त संवादाचा वाढता विरोध पाहता चित्रपटाचे संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी रविवारी ट्विट करून चित्रपटाबाबत स्पष्टीकरण दिले आणि चित्रपटातील वादग्रस्त संवाद या आठवड्यात बदलले जातील असे सांगितले.

नेपाळच्या आक्षेपावरही चित्रपटात बदल

नेपाळ सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही चित्रपटातील सीतेच्या जन्मस्थानासंदर्भातील वादग्रस्त विधान हटवण्यात आले. त्यानंतर तेथे चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, उर्वरित संवादांमुळे हा चित्रपट वादात सापडला असून आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये 40 टक्क्यांनी घसरण

जगभरात चित्रपटाने दोन दिवसांत 240 कोटींची कमाई केली. त्यामुळं चित्रपटाने 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या दिवशी 140 कोटी कमावणारा आदिपुरुष दुसऱ्या दिवशी केवळ 100 कोटी कमावू शकला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच चित्रपटाच्या कमाईत 40% घसरण नोंदवली गेली.

Despite controversy, Adipurush film in 300 crore club, shows canceled in Mumbai, Hanuman Chalisa chanted in front of theaters in Chhattisgarh

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात