गुंतवणूकदारांचा चीनमधून काढता पाय, भारतात 6 वर्षांतील सर्वधिक गुंतवणूक, कंपन्यांची पसंती भारताला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक निधी व्यवस्थापक व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) चीनवर नाराज होत आहेत. बहुतांश गुंतवणूकदार कोविडनंतर चीनमध्ये मोठ्या संधीचा फायदा घेण्यास पोहोचले होते. पण घटती मागणी आणि जीडीपीमुळे ते चीनच्या शेअर बाजारातून पैसे काढून भारतात गुंतवत आहेत. 2023 पर्यंत 1.47 लाख कोटी परकीय गुंतवणूक आली आहे. ती गेल्या 6 वर्षांतील सर्वाधिक आहे. यापैकी 9 अब्ज डॉलर (73,800 कोटी रुपये) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आले होते. याचे मुख्य कारण पुरवठ्याबाबत जगाला चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्या निघून जात आहेत.

डिपॉझिटरी डेटानुसार परदेशी गुंतवणूकदार या वेळी भारतात जास्त काळ थांबणार आहेत. ते येथे दररोज सुमारे 1400 कोटींची खरेदी करत आहेत. विदेशी ब्रोकरेज फर्म जेफरीजमधील इक्विटी स्ट्रॅटेजीचे जागतिक प्रमुख क्रिस्टोफर वूड यांच्या मते, पुढील 10 वर्षांत परदेशी गुंतवणूकदार चीनच्या अर्थव्यवस्थेबद्दल फारसे आशावादी नाहीत. ते भारतातील भविष्याकडे पाहत आहेत. त्यात अमेरिकन व युरोपीय गुंतवणूकदार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात चिनी बाजारातून 1.71 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकले.



एफएफआयची पहिली पसंती ठरतोय भारत

2022 मध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपल्या शेअर बाजारात सर्वधिक ~ 1.25 लाख कोटींची विक्री केली होती. कारण कोविडनंतर त्यांचा चीनवर जास्त विश्वास होता. आता परिस्थिती उलट झाली.भारताचा जीडीपी वाढत आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार येत आहेत. मॉर्गन स्टॅन्लेने भारतीय अर्थव्यवस्थेला अपग्रेड तर चीनला डाऊनग्रेड केले.

सर्व मोठ्या फंड्सची चीन सोडून भारतात गुंतवणूक

चीनमधील थेट विदेशी गुंतवणूक 5 महिन्यांत 84.35 अब्ज डॉलर झाली. वार्षिक आधारावर 5.6% ची घट झाली. कोविडनंतर चीनकडून अपेक्षित परतावा मिळाला नाही. म्हणूनच नेव्हेस्को, ब्लॅकरॉक, व्हॅनगार्ड, सेक्व्होया, कॉम्बिनेटर, सॉफ्टबँकसारखे पीई फंड भारतात आले. सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, यूएई, नेदरलँड्समधून सर्वाधिक गुंतवणूक आली.

Investors withdraw from China, highest investment in India in 6 years

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात