EPFची शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 15 वरून 20%, या महिन्यात निर्णय

प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शेअर बाजारातील गुंतवणुकीची विद्यमान मर्यादा १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्याच्या विचारात आहे. २९-३० जुलै रोजी EPFO विश्वस्तांची बैठक होत असून या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.EPF investment limit in stock market from 15 to 20%, decision this month

सध्या EPFOजवळ असलेल्या निधीपैकी ५ ते १५ टक्के रकमेची शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, सीबीटीची उपसमिती एफआयसीने शेअर बाजार आणि त्यासंबंधित गुंतवणुकीची मर्यादा ५ ते १५ टक्क्यांवरून ५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ‌वण्यात यावी,अशी शिफारस केली आहे.EPFOने ऑगस्ट 2015 मध्ये एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये (ईटीएफ) गुंतवणूक करण्यास मान्यता दिली होती. विद्यमान आर्थिक वर्षात त्याची मर्यादा १५ टक्के करण्यात आली आहे.

EPF investment limit in stock market from 15 to 20%, decision this month

महत्वाच्या बातम्या