वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच टक्के वाढ झाली. त्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर ७५.४४ डॉलर प्रति बॅरल झाला. सोमवारीदेखील ४.६ टक्के वाढ झाली होती. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडचे दर ७२.०५ डॉलर प्रति बॅरेल झाले होते. International crude oil prices soared; Inflation is likely to erupt in the country
कोरोनाच्या ओमायक्रॉनवर लस कमी प्रभावी ठरणार आहे, असे वृत्त होते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी सरकार निर्बंध लावू करू शकते, असा अंदाज होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात तेलाच्या किमती घसरल्या होत्या. मात्र, ओमायक्रॉनबाबत चिंतेचे कारण नसल्याचे वक्तव्य शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून आले. त्याचा परिणाम बाजारावर झाला. ट्रेडिशन एनर्जीचे विश्लेषक गॅरी कनिंगहॅम यांनी म्हटले की, सहा ते १२ महिन्यात तेलाची मागणी वाढली.चीनने देखील नोव्हेंबर महिन्यात तेलाची आयात वाढवली होती.
निर्यातदार सौदी अरेबियाने तेलाच्या दरात वाढ केली होती. तसेच तेल उत्पादक देशानी उत्पादन वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. दरम्यान, आण्विक कार्यक्रमामुळे इराणवर असलेल्या निर्बंधाचा परिणामही बाजारावर दिसत आहे. इराणकडून तेलाच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्याचा थेट फटका तेलाच्या किमतीवर झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App