प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर नाही. आज देखील शेतकऱ्यांचा मोर्चा येणार हे पाहून त्या मोर्चाला सामोरे जाण्याऐवजी विधिमंडळ अधिवेशन विधानसभा तहकूब करून सत्ताधारी पळून गेले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या किसान मोर्चाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा नेण्यात आला. त्या वेळी झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते.Instead of confronting the farmers’ front, the ruling party fled the assembly; Fadnavis’s blow
फडणवीस म्हणाले, की ओबीसींच्या प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही. शेतकर्यांच्या समस्येवर सरकारकडे उत्तर नाही. थेट दोन दिवसांसाठी कामकाज तहकूब करून टाकले. असले सावकारी सरकार महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. धनदांडग्यांकडून वेगळी वसुली आणि शेतकर्यांकडून अशी वसुली करणारे महाविकास नव्हे, हे महावसुली सरकार आहे.
भाजपा किसान मोर्चाच्या वतीने शेतकर्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, हरिभाऊ नाना बागडे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, वासुदेव नाना काळे आदी उपस्थित होते.
ओबीसींच्या प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही!शेतकर्यांच्या समस्येवर सरकारकडे उत्तर नाही!थेट दोन दिवसांसाठी कामकाज तहकूब करून टाकले!असे सावकारी सरकार महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते!धनदांडग्यांकडून वेगळी वसुली आणि शेतकर्यांकडून अशी वसुली!महाविकास नव्हे, हे महावसुली सरकार!#BJP pic.twitter.com/88oMj9wJqc — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 4, 2022
ओबीसींच्या प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही!शेतकर्यांच्या समस्येवर सरकारकडे उत्तर नाही!थेट दोन दिवसांसाठी कामकाज तहकूब करून टाकले!असे सावकारी सरकार महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते!धनदांडग्यांकडून वेगळी वसुली आणि शेतकर्यांकडून अशी वसुली!महाविकास नव्हे, हे महावसुली सरकार!#BJP pic.twitter.com/88oMj9wJqc
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 4, 2022
ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या फटकारानंतर ओबीसी आयोगाला 30 कंत्राटी जागा काल मंजूर केल्या. काल हा शासन आदेश काढण्यात आला. दोन वर्ष फाईलींवर बसून रहायचे, मंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवायचे, आता शंका येते महाविकास आघाडीला ओबीसींना आरक्षण द्यायचे आहे की नाही?, अशी शंका येते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App