वृत्तसंस्था
वाराणसी – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत शेवटच्या टप्प्यातले म्हणजे फक्त ७ मार्च रोजीचे मतदान राहिलेले असताना प्रचाराने आज परमोच्च बिंदू गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीत रोड शो केला.U. P. aseembly election – PM naresndra modi took road show on varanasi streets after 3 years
या रोड शोमध्ये गेल्या वेळच्या रोड शो सारखात प्रचंड उत्साह दिसून आला. या रोड शो च्या आधी पंतप्रधान मोदींनी वाराणसीत भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
#WATCH Prime Minister Narendra Modi's roadshow as a part of campaigning for the last phase of Uttar Pradesh Assembly elections, in Varanasi, draws huge crowds of people Last phase of polling in Uttar Pradesh Assembly elections is on 7th March. pic.twitter.com/LsNFkwqmPI — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
#WATCH Prime Minister Narendra Modi's roadshow as a part of campaigning for the last phase of Uttar Pradesh Assembly elections, in Varanasi, draws huge crowds of people
Last phase of polling in Uttar Pradesh Assembly elections is on 7th March. pic.twitter.com/LsNFkwqmPI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मोदींनी मोठमोठ्या जाहीर सभा घेतल्या. पण या वेळच्या लोकसभेच्या प्रचारात प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा हे केंद्रीय नेते आघाडीवर होते. पंतप्रधान मोदींनी अयोध्या, कानपूर, झाशी आदी शहरांमध्ये तसेच पूर्वी उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतल्या.
आजचा दिवस पंतप्रधान मोदींनी वाराणसीसाठी राखून ठेवला होता. यात प्रामुख्याने रोड शो मुख्य होता. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मोदी जेव्हा दुसऱ्यांदा वाराणसीतून उभे राहिले, तेव्हा त्यांनी असाच मोठा रोड शो केला होता. त्यानंतर तीन वर्षांनी बनारसवासीयांनी पंतप्रधान मोदींचा रोड शो अनुभवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App