भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण ‘आयएनएस वेला’ (INS Vela) ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.
वृत्तसंस्था
मुंबई : नौदलाची ताकद वाढवण्यासाठी प्रोजेक्ट 75 प्रकल्पातील वेलाही स्कॉर्पिओ जातीची चौथी पाणबुडी नौदल ताफ्यात दाखल करून घेण्यात आली. नौदलप्रमुख अॅडमिरल कर्मबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला.प्रोजेक्ट 75 मध्ये सहा पाणबुड्या बांधल्या जात असून वेला ही त्यातील चौथी पाणबुडी आहे. INS Vela: Submarine ‘INS Vela’ enters Indian Navy ! Symbol of self-reliant India! What is specialty
ही पाणबुडीदेखील तिच्या विशिष्ठ रचनेमुळे तसेच तिच्या आवरणामुळे शत्रूच्या सोनार वा अन्य शोधक यंत्रणेला चकविण्यात यशस्वी ठरते.तिच्यावर शत्रूच्या पाणबुड्यांचा नाश करण्यासाठी लांब पल्ल्याचे पाणतीर (टॉरपेडो) व जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आहेत.
शत्रूच्या जहाजांना व पाणबुड्यांना शोधण्यासाठी त्यावर अत्याधुनिक सोनार यंत्रणा व सेन्सर्स असतात.तसेच या पाणबुडीवर प्राणवायू निर्मितीसाठी वेगळी यंत्रणा असल्याने या पाणबुड्या नेहमीच्या परंपरागत पाणबुड्यांपेक्षा जास्तवेळ पाण्याखाली राहू शकतात.
याबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आयएनएस वेलाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन अनीस मॅथ्यू म्हणाले, की ‘ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.या पाणबुडीमध्ये स्वदेशी बॅटरी आणि अॅडव्हान्स कम्युनिकेशन सेट आहे.त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या कल्पनेला प्रोत्साहन मिळतं.
आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आयएनएस वेला या पाणबुडीची लांबी 75 मीटर आणि वजन 1615 टन आहे.या पाणबुडीवर एका वेळी 35 खलाशी (नौसैनिक) आणि 8 अधिकारी तैनात केले जाऊ शकतात.
वेला पाणबुडी समुद्राखाली 37 किमी वेगाने धावू शकते. तळ सोडल्यानंतर आयएनएस वेला 2 महिने समुद्रात राहू शकते.नौदलाच्या गरजा लक्षात घेऊन या पाणबुडीमध्ये युद्धसामग्री बसवण्यात आली आहे. समुद्राखाली असतानाही ती क्षेपणास्त्राने शत्रूच्या पाणबुड्या आणि जहाजं नष्ट करू शकते.
वेला पाणबुडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी क्षेपणास्त्रंदेखील आहेत, ज्यामध्ये हवेत उडणाऱ्या शत्रूच्या विमानांवर पाण्याखालून मारा करण्याची ताकद आहे.भारतीय नौदलात आयएनएस वेला समाविष्ट झाल्यानंतर पाणबुड्यांची एकूण संख्या 17 झाली.
भारतीय नौदल सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. त्यासाठी सातत्याने नौदल आपल्या ताफ्यामध्ये विविध पाणबुड्या समाविष्ट करून घेत असते. नौदलात आयएनएस विशाखापट्टणमच्या समावेशामुळे समुद्रातली भारताची ताकद वाढली आहे. त्यातच भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस वेला ही पाणबुडीही समाविष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App