लोकसभेत महागाईवर चर्चा आणि तृणमूळ खासदार महुआ मोईत्रांच्या दीड लाखाची बॅग लपविण्याचा “बोलबाला”!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभेत काल महागाईवर चर्चा झाली विरोधकांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या मुद्द्यावर जोरदार शरसंधान साधले. भारताची “श्रीलंका” होईल, असा इशारा दिला. विरोधकांच्या आरोपांना अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सडेतोड उत्तर दिले. महागाई नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला.

परंतु, या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदाराची एक वेगळी हरकत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. ती म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या तळमळ काँग्रेसच्या खासदार महुवा मोहित रा यांची दीड लाखाची बॅग चर्चेचा विषय ठरली आहे. Inflation debate in Lok Sabha and Trinamool MP Mahua Moitra’s 1.5 lakh bag

लुई विटन कंपनीची बॅग

महागाई सारख्या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करताना महूआ मोईत्रा या दीड लाखाची बॅग बाळगतात. त्या नुसत्या बाळगत नाहीत, तर लपवतात म्हणून त्या ट्रोल देखील झाल्या आहेत. महुआ मोईत्रा यांच्याकडे लुई विटन या फ्रान्सच्या कंपनीची बॅग आहे. तिची किंमत दीड लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. लुई विटन कंपनी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज निर्मिती आणि विक्रीमध्ये आघाडीवर आहे.

वढी महाग दीड लाख रुपयांची बॅक ठेवण्याचे ऐपत मोहुआ मोईत्रांकडे आहे आणि त्या महागाईवर गळे काढतात अशा शब्दांमध्ये सोशल मीडियामध्ये त्यांना अनेकांनी ट्रोल केले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकुली दस्तगीर महागाईवर आपला मुद्दा मांडत असताना महुआ मोईत्रा आपली लुई विटन बॅग पायाशी लपवताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यावरूनच त्यांना अनेकांनी टोल केले आहे.

Inflation debate in Lok Sabha and Trinamool MP Mahua Moitra’s 1.5 lakh bag

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub