वृत्तसंस्था
लखनौ : कर्नाटकात सर्वच्या सर्व 12.95% मुस्लिमांना OBC ओबीसी मध्ये घुसवून त्यांना OBC च्या हक्काचे आरक्षण मुस्लिमांना वाटून देणे हे भारताच्या इस्लामीकरणाचे घृणास्पद कारस्थान आहे, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. Infiltrating all Muslims into OBC is a ploy to Islamize India
कर्नाटक मध्ये सर्व मुस्लिमांना OBC दर्जा देणारा अध्यादेश काँग्रेस सरकारने अस्तित्वात आणला. नंतर त्याचे कायद्यात रूपांतर केले आणि याचा परिणाम म्हणून OBC समाजाच्या हक्काचे आरक्षण विभाजित होऊन त्याचा लाभ सर्व जातींमध्ये पसरलेल्या मुस्लिमांना दिला जातो आहे. यातून मूळ OBC आरक्षणाच्या टक्केवारीवर परिणाम होत असून OBC चे हक्क मारले जात आहेत.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी या मुद्याकडे कालच लक्ष वेधले होते. त्यांनी कर्नाटक सरकारच्या अध्यादेशाचे आणि कायद्याचे तपशील देऊन ते कसे घटनाबाह्य आहे, असे स्पष्ट सांगितले होते. या पार्श्वभूमीवर देशात कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरुद्ध प्रचंड संताप उसळला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील कर्नाटक सरकारचे वाभाडे काढले आहेत.
बाबर – औरंगजेबाच्या अत्याचारांनी जो संपला नाही, तो सनातन धर्म हे तुच्छ लोक काय संपवणार??; योगी आदित्यनाथांचा अंगार!!
योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. हे भारताच्या इस्लामीकरणाच्या घृणास्पद प्रयत्नांचा एक भाग आहे. युपीए सरकार सत्तेवर आले तेव्हाही काँग्रेसने असेच प्रयत्न केले गेले. त्यावेळी भाजपने मोठे आंदोलन करून देशाच्या इस्लामीकरणाचे काँग्रेसचे प्रयत्न हाणून पाडले होते, मग न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल असो किंवा सच्चर समितीचा अहवाल असो या अहवालांमधून काँग्रेस सरकारचा OBC, SC, ST च्या आरक्षणाची लूट करण्याचाच डाव होता. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या मर्मावर बोट ठेवत या मुद्द्यांकडे देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारची देश विघातक भूमिका यूपीए सरकार पेक्षा वेगळी नाही. कर्नाटकात OBC समाजांना 32 % आरक्षण आहे. पण त्यातले आरक्षण ओरबाडून त्यातली मोठी टक्केवारी कर्नाटक सरकारने मुस्लिमांना दिल्याचे घृणास्पद सत्य बाहेर येत आहे. काँग्रेसचा यातला हेतू अत्यंत गैर आहे. त्यांचा हेतू चांगला नाही हे यातून दिसून येते. देश आणि जनतेला सतर्क राहावे लागेल, असा इशाराही योगी आदित्यनाथ यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App