मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ

Manish Sisodias judicial custody extended till May 7

यापूर्वी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना बुधवारी मोठा धक्का बसला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.Manish Sisodias judicial custody extended till May 7यासोबतच या प्रकरणातील जबाब आणि पुरावे दाखवण्यासाठी एक टेबल तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात होणार आहे.

दिल्ली दारू धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सध्या आरोप निश्चित करू नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टाने केंद्रीय तपास यंत्रणेकडून उत्तर मागितले आहे.

आरोपीच्या वकिलाने सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगितले की, आम्ही कोर्ट रूममधून बाहेर पडायला नको होते. याबद्दल आम्ही माफीही मागतो. यावर नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती म्हणाले की, अशा प्रकारची वागणूक आपण प्रथमच पाहिली आहे. तुमचा युक्तिवाद पूर्ण होताच तुम्ही कोर्टातून बाहेर पडलात. दरम्यान, याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की अद्याप तपास सुरू आहे. तर सीबीआयने या युक्तिवादाला विरोध केला.

Manish Sisodias judicial custody extended till May 7

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात