इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास केली सुरुवात ; म्हणाले…..


 

”मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही.” इंदुरीकर महाराजांच्या या विधानाची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.Indurikar Maharaj started raising awareness about corona vaccine from Jalna district; Said …..


विशेष प्रतिनिधी

जालना : मागील काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराज म्हणाले होते की , ”मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही.”त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.

दरम्यान आता इंदोरीकर महाराजांनी जालन्यातून कोरोना जनजागृतीला सुरुवात केली आहे.याच कारण म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जालन्यात इंदुरीकर महाराजांची भेट घेतली.या भेटीत टोपेंनी लशीबाबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन केले आहे.

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या असं आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे. जालना जिल्ह्यातूनच त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

तसेच महाराजांनी इंदोरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या,कोरोना तणावमुक्त करा, अस आवाहन करत त्यांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात ही केली. त्यामुळे टोपे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.इंदोरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Indurikar Maharaj started raising awareness about corona vaccine from Jalna district; Said …..

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात