ऐतिहासिक कामगिरी : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखात झरीनला सुवर्णपदक!!


  • मनीषा मॉन, प्रवीण हुडाला ब्राँझपदक; पंतप्रधान मोदींकडून तिघांचे खास अभिनंदन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची महिला बॉक्सर निखत झरीन हिने IBA च्या महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामुळे जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली आहे. तिने थायलंडच्या जुतामास जितपॉंग हिला ५-० ने पराभूत केले. या स्पर्धेत भारताच्या मनीषा मॉन आणि प्रवीण हुडा यांनी आपापल्या कॅटेगिरी ब्राँझ पदक जिंकले आहे. India’s Nikhat Zareen wins gold at World Boxing Championships

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनही खेळाडूंचे अभिनंदन केले असून त्यांनी भारताची मान क्रीडा क्षेत्रात उंचावल्या बद्दल विशेष कौतुक करून क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिले आहेत

– मेरी कोम नंतर गौरव

जागतिक बॉक्सिंगचा अंतिम सामना निखतने जिंकल्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल, आणि लेखा सी. या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकलेल्या महिलांच्या यादीत निखत झरीनचा समावेश झाला आहे. मात्र या स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनिषा मॉन हिला सुवर्णपदक जिंकता आले नाही. पण तिने जिद्दी खेळ करत ब्रॉंझपदक पटकावले आहे.

निखात झरीन तेलंगणमध्ये हैदराबादची. निघत नाही सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उज्वल केल्याबद्दल तिची आई परवीन सुलताना हिने देखील तिचे कौतुक केले आहे. निखत आपल्या मेहनतीच्या बळावर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव रोशन करेल, असा विश्वासही परवीन सुलताना यांनी व्यक्त केला आहे.

India’s Nikhat Zareen wins gold at World Boxing Championships

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात