वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 66,85,415 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 94 कोटी मात्रांचा (94,70,10,175) टप्पा पार केला आहे. देशभरात 92,12,314 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.India’s Cumulative COVID-19 Vaccination Coverage crosses the landmark of 94 Cr
गेल्या 24 तासांत 23,624 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,32,71,915 झाली आहे.
परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.99% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 105 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.
गेल्या 24 तासांत, 18,166 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. 214 दिवसांमधील एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,30,971 इतकी आहे आणि ही गेल्या 208 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.68%आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,83,212 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 58 कोटी 25 लाखांहून अधिक (58,25,95,693) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.57% असून गेले 107 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.42%.आहे. . दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 41 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 124 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App