आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, प्रथमच जिंकले सुवर्णपदक!


श्रीलंकेचा संघ रौप्यपदकासह आपल्या देशात परतणार आहे.

विशेष प्रतिनिधी

 नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी झाला, जिथे टीम इंडियाने 117 धावांचे लक्ष्य ठेवले आणि त्यानंतर गोलंदाजांनी त्याचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तर, श्रीलंकेचा संघही रौप्यपदकासह आपल्या देशात परतणार आहे. Indian womens cricket team created history in the Asian Games won the gold medal for the first time

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना 46 (45) आणि जेमिमाह रॉन्ड्रिक्स 42 (40) धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारतीय संघाने 20 षटकांत स्कोअर बोर्डवर 116/7 धावा केल्या. या कमी धावसंख्येचा सामना होता. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाने 20 षटके खेळली, परंतु त्यांना केवळ 97/8 अशीच धावसंख्या गाठता आली.  परिणामी भारतीय संघाने सामना 19 धावांनी जिंकला. यासह भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

भारतातर्फे तीतस साधूने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 6 धावा देत 3 बळी घेतले. तर राजेश्वरी गायकवाडने 3 षटकात 20 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Indian womens cricket team created history in the Asian Games won the gold medal for the first time

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात