पंतप्रधान मोदींचे जयपूरमधून काँग्रेसच्या गेहलोत सरकारवर जोरदार टीकास्त्र


जे सरकार आपल्या बहिणी-मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही, ते सरकार जाणार हे निश्चित आहे. असेही मोदींनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे रोड शो केला. यानंतर त्यांनी जयपूरच्या बाहेरील वाटिका येथील दादिया गावात एका जनसभेला संबोधित केले.  मोदी म्हणाले, “राजस्थानचे वातावरण बदलल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. या यशस्वी यात्रांबद्दल (परिवर्तन यात्रा) मी राजस्थानच्या प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचे आणि जनतेचे अभिनंदन करतो. आज संपूर्ण जगात भारताच्या सामर्थ्याची प्रशंसा होत आहे. आमचे चांद्रयान जिथे आतापर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही तिथे पोहोचले. भारताला विरोध करणारे देश सुद्धा G20 मध्ये भारताच्या यशाने आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाले आहेत. भारताने गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या नवीन संसद भवनातून कामाला सुरुवात केली आणि नवीन संसदेतील पहिले कार्य भाजपा सरकारने आपल्या भगिनी आणि मुलींना  समर्पित केले आहे.” Prime Minister Modi strongly criticized the Gehlot government of Congress from Jaipur

याचबरोबर ”गेल्या पाच वर्षात काँग्रेसने ज्या प्रकारे सरकार चालवले आहे, ते शून्य क्रमांक मिळविण्यास पात्र आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेहलोत सरकारने राजस्थानच्या जनतेची पाच वर्षे खराब केली आहेत. जे सरकार आपल्या बहिणी-मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही, ते सरकार जाणार हे निश्चित आहे. आता राजस्थानचे वातावरण बदलल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे. आज मी जयपूरला अशा वेळी आलो आहे जेव्हा देशाचा सर्वत्र गौरव होत आहे.” असेही मोदींनी सांगितले.

याशिवाय मोदी म्हणाले की, ”हे सनातनला नष्ट करू, असे म्हणत आहेत. याचा फटका अहंकारी महाआघाडीला सहन करावा लागणार असून, त्यांचा पूर्ण सफाया होणार आहे. राजस्थानमध्ये जेव्हा जेव्हा पेपर लीक होतात तेव्हा येथील सरकार पेपर लीक माफियांना संरक्षण देते.भाजपा सरकार आल्यानंतर कडक कारवाई केली जाईल. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही. ज्या ठिकाणी लाल डायरीत काळे कृत्ये आहेत, जिथे सार्वजनिक ठिकाणी गळा चिरण्याच्या घटना घडत आहेत आणि सरकार हतबल आहे, तिथे गुंतवणूक कशी होणार.जे सरकार बहिणी-मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा ठिकाणी पैसे कोणाला गुंतवायचे? हे सरकार जाणार हे निश्चित आहे.”

जयपूर जिल्ह्यातील धनक्या गावात रोड शो करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी जयपूर विमानतळावर पोहोचले, तेथून ते हेलिकॉप्टरने धनक्या गावात पोहोचले. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे बालपण जयपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनक्या गावात गेले. या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मारक बांधण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकाची पाहणी केली.

Prime Minister Modi strongly criticized the Gehlot government of Congress from Jaipur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात