विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जसा जवळ येतात तसतशी लोकप्रतिनिधींच्या तोंडची भाषा घसरते, हे महाराष्ट्राला नवे नाही. लांडगे – डुक्कर ही भाषा महाराष्ट्राने नुकतीच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी ऐकली, पण आता ही भाषा नुसती घसरती राहिली नाही, तर ती गटारी गटारा पर्यंत पोहोचली आहे, हे शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या आजच्या वक्तव्यातून दिसून आले. माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी ही निष्ठे – विष्ठेची भाषा वापरली आहे. Abusive language in maharashtra reached its lowest
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ आणि अजित निष्ठा या दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना पात्र करण्यासंदर्भातले अर्ज विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी निष्ठे – विष्ठेची भाषा वापरली.
शरद पवारांकडे राहून आमचे आमदार अपात्र झाले तरी चालतील, पण आम्ही निष्ठावंत राहू. स्वतःची निष्ठा सोडून दुसरीकडे विष्ठेसाठी जाणाऱ्यांनी आमच्या पात्र-अपात्रतेविषयी चिंता करू नये. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेलेच न्यायालयात अपात्र ठरतीलच आणि तिथे अपात्र ठरले नाहीत, तर जनतेच्या न्यायालयात अपात्र ठरतील. जनता खोकेबहाद्दरांना पाडेल, असे वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केले. निष्ठा – विष्ठा अशी यमक जुळवलेली भाषा वापरून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता गटारी भाषेपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी दाखवून दिले.
गेल्या आठवड्यातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांविषयी वक्तव्य करताना लांडग्याची भाषा वापरली होती. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे, असे ते म्हणाले होते. अजित पवारांनी दुर्लक्ष करून ते विधान उडवून लावले होते.
पण त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका हातगाडीवर डुकरांची पिल्ले ठेवून त्यांच्या गळ्यात गोपीचंद पडळकर अशी पाटी लटकवलेले फोटो व्हायरल केले होते. त्यावेळेस महाराष्ट्राचे राजकारण लांडग्या डुकरांवर येऊन पोहोचल्याचे दिसत होते. पण आता त्या पलीकडे जाऊन शशिकांत शिंदे यांच्या तोंडी निष्ठे – विष्ठेची भाषा आली आणि हे राजकारण गटारी भाषेपर्यंत येऊन ठेपल्याचे दिसून आले. हे सर्व महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू असताना घडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App