नागालँडमध्ये तेमजेन यांच्या जागी बेंजामिन पक्षाध्यक्ष!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजपा) देशभरात आपले संघटन मजबूत करण्यात व्यस्त आहे. त्यासाठी राज्यांमध्ये वेळोवेळी संघटनात्मक बदलही केले जात आहेत. याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने ईशान्येकडील राज्यांमध्ये संघटनात्मक नेतृत्वात बदल केले आहेत. Organizational change in Northeast by BJP State presidents of Nagaland Meghalaya and Puducherry have changed
भारतीय जनता पक्षाने ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. या राज्यांमध्ये नागालँड, मेघालय आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हा आदेश जारी केला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.
भाजपने मेघालयमध्ये रिकमन मोमीन यांना पक्षाध्यक्ष केले. अर्नेस्ट मोरी यांच्या जागी मोमीन यांना ही जबाबदारी देण्यात आली. पुद्दुचेरीमध्ये व्ही समीनाथन यांच्या जागी एस सेल्वागनबाथी यांची पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागालँडमध्येही भाजपने तेमजेन इमना अलँग यांना हटवले आहे. आता तेमजेन यांच्या जागी बेंजामिन येपथोमी यांना नागालँड भाजपचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तीन राज्यांचा विचार केला तर मेघालय, नागालँड आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण ४ जागा आहेत. नागालँडमध्ये एनडीएच्या तोखेहो येपथोमी यांनी 2019 मध्ये NDPP उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App