भारतीय रेल्वे घेणार आई – बाळाची काळजी; गाडीत लोअर बर्थला जोडला बेबी बर्थ!!


प्रतिनिधी

मुंबई : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध छोटे मोठे पण परिणामकारक निर्णय घेत आहे. महिला प्रवाशांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना ट्रेनमधील सीटवर बाळासोबत झोपणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन रेल्वेने ट्रेनमधील लोअर बर्थला बेबी बर्थ जोडला आहे. Indian Railways to take care of mother and baby

– प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

लखनौ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या लखनौ मेल ट्रेनमध्ये एक नवीन कोच तयार करण्यात आला आहे. या गाडीत महिला प्रवाशांच्या नवजात बालकासाठी बेबी बर्थ जोडण्यात आला आहे. यामुळे मातांना त्यांच्या बाळासोबत आरामात झोपता येईल. ही सीट फोल्डही करता येते. तसेच हे बेबी बर्थ वर आणि खाली केले जाऊ शकते. बेबी बर्थमध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. बेबी बर्थ ७७० मिमी लांब आणि २५५ मिमी रुंद असेल तर या बर्थची जाडी ७६.२ मिमी ठेवण्यात आली आहे. लखनौ गाडीत 8 मे मदर्स डे निमित्ताने हा बेबी बर्थ जोडण्यात आला.– प्रतिसादानंतर विस्तार

ही सुविधा सगळ्या गाड्यांमध्ये सुरू झाल्यावर बेबी बर्थ सुविधेसाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी या सीटचे बुकिंग करण्याची तरतूद नाही. रेल्वे सध्या ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्ण तिकीट आकारते. पूर्वी हे दर ५० % होते. पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली ही सुविधा प्रवाशांच्या प्रतिक्रिया मिळाल्यानंतर आणखी गाड्यांमध्ये विस्तारीत करता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Indian Railways to take care of mother and baby

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात