भारतीय संघाचा हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि दोन्ही गोल केले. हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना खेळला गेला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला. आता टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. हा गोल पाकिस्तानच्या अहमद नदीमने पहिल्या क्वार्टरच्या 8व्या मिनिटाला केला. सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध एकही फटकेबाजी केली नाही आणि संघ केवळ एका गोलपुरता मर्यादित राहिला.
China : चीनने निवृत्तीचे वय वाढवले, घटत्या लोकसंख्येमुळे निर्णय; पुरुष 63 व महिला 58 वर्षांपर्यंत काम करणार
सामन्यात पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने 13व्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला बरोबरी साधून दिली. हा गोल पेनल्टी कॉर्नरवरून झाला. अशाप्रकारे पहिल्या 15 मिनिटांच्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ 1-1 असे बरोबरीत राहिले.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने 19व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल केला. कर्णधाराने दुसरा गोलही पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. आता भारताने सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली होती. भारताची ही आघाडी विजयासाठी पुरेशी होती. टीम इंडिया 2-1 ने जिंकली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App