विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – चीनबद्दल वाढलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्याच्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाला भारताने जाहीर पाठिंबा दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभरात पसरला असून हा विषाणू नैसर्गिक नव्हे तर प्रयोगशाळेत तयार केला असल्याचाही आरोप होत आहे. विषाणूचा नेमका उगम कोठून झाला याची जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी करावी, या मागणीनेही जोर धरला आहे. India warns china regarding corona spread
भारताने कोरोना उगमाच्या व्यापक चौकशीला खुला पाठिंबा देत सीमावादावरून कुरापती काढणाऱ्या चीनला सूचक इशाराही दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनातून आरोग्य संघटनेच्या अध्ययनाला भारताचा पाठिंबा जाहीर केला. मात्र, चीनचे थेट नाव घेण्याचे टाळले.
LAC वर चीनची लष्करी कवायत, सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले, सीमेवर एकतर्फी बदलास परवानगी नाही, हवाई दलाच्या प्रमुखांनीही घेतला आढावा
कोरोना विषाणूचे उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने सुरू असलेले वैश्विक अध्ययन हे महत्त्वाचे पाऊल आहे. योग्य निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी तसेच तपशील मिळविण्यासाठी आणखी अध्ययनाची आवश्यकता आहे.
अमेरिकेने दुसऱ्या टप्प्यातील चौकशीची मागणी केली. तर जागतिक आरोग्य संघटनेनेही यासाठी होकार दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावर चीनला घेरण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुप्तहेर यंत्रणांना ९० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App