पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हुकमी एक्का परततोय; शुभमन गिल इज बॅक!!

india vs pakistan come back shubhaman gill

वृत्तसंस्था

अहमदाबाद :  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताचा हुकमी एक्का परत येतोय. शुभमन गिल 99% तंदुरुस्त असून तो उद्याच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा बरोबर सलामीला उतरणार आहे. india vs pakistan come back shubhaman gill

ऐन विश्वचषकाच्या मोसमात डेंग्यू झाल्याने शुभमनला रुग्णालयात दाखल करावे लागले होते, पण त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो आता बरा होऊन आज त्याने नेट प्रॅक्टिस केली. तो 99% तंदुरुस्त आहे, त्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळू शकतो, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

शुभमन गिल याच्या गैरहजेरीत भारताने ईशान किशन याला रोहित शर्मा बरोबर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात उतरविले, पण त्याची बॅट चालली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शून्यावर बाद झाला, तर अफगाणिस्तान विरुद्ध त्याने 47 धावा केल्या. पण शुभमन गिल हा पाकिस्तान विरुद्धचा हुकमी एक्का आहे. तो उद्याच्या सामन्यात उतरल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबरोबरच तो भारताची फलंदाजीची बाजू मजबूत करणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांना पराभूत केल्यानंतर उद्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला भारत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी 1 लाख 30 हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडिअम हाऊसफुल्ल झाले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

डेंग्यूच्या आजारातून बरा झालेला शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप अनिश्चितता होती, पण चांगली गोष्ट म्हणेज शुभनन गिलने आज सराव केला. गिलऐवजी संघात संधी मिळालेल्या ईशान किशनने पहिल्या सामन्यात 0 तर दुसऱ्या सामन्यात 47 धावा केल्या. पण त्याच्या खेळीत आत्मविश्वास जाणवला नाही. पण शुभमन गिल उद्याच्या सामन्यात खेळल्यानंतर भारताची फलंदाजीची बाजू पाकिस्तान पेक्षा मजबूत असणार आहे.


वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला धक्का, शुभमन गिलची प्रकृती खालावली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे कठीण


गोलंदाजीत बदल होणार?

फलंदाजी एक बदल वगळता फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तर गोलंदाजीत दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराने 39 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. पण दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई झाली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्द शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शार्दुल ठाकूरलाही बाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात आर. अश्विनला वगळत टीम इंडियात शार्दुल ठाकूरलला संधी देण्यात आली. टीम इंडियाच्या या निर्णयावर क्रिकेट चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ऑस्टेलियाविरुद्धच्या सामन्यात अश्विनने 10 षटकांमध्ये केवळ 34 धावा देत 1 विकेट घेतली होती. भारताच्या दिग्गज खेळाडूंनीही अश्विनला वगळण्यात आल्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरऐवजी आर अश्विनची प्लेईंग इलेव्हनमध्य पुन्हा एन्ट्री होऊ शकते.

शमीची एन्ट्री होणार

प्लेईंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचा बदल ठरणार आहे तो मोहम्मद शमीचा. नरेंद्र मोदी स्टेडिअम हे मोहम्मद शमीचे होमग्राऊंड आहे. आयपीएलमध्ये शमी गुजरात टायटन्सकडून खेळत होता, मोदी स्टेडिअमवर शमीची कामगिरी दमदार आहे. आयपीएल 2023 मध्ये शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या होत्या. यात नरेंद्र मोदी मोदी स्टेडिअममध्ये त्याने सर्वाधिक 17 विकेट घेतल्या. त्यामुळे शमीसाठी हे मैदान लकी आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी/ रव‍िचंद्रन अश्व‍िन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेवन

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन शाह आफरीदी, हारिस रऊफ.

india vs pakistan come back shubhaman gill

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात