India-US partnership : अमेरिकन शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट ! इंडो-पॅसिफिकसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

अमेरिकेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.India-US partnership: US delegation meets PM Modi! Discussion on many important issues including Indo-Pacific


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी भारत- अमेरिका संबंध अंतरराष्ट्रीय स्थरावर अधिक मजबूत करण्यावर चर्चा झाली. सोबतच दोन देशांमधील व्यापारी संबंध कशाप्रकारे आणखी वाढवता येतील, यावर देखील विचारमंथन झाले. अमेरिकन खासदार जॉन कोर्निन हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.

अमेरिकन शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती पीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये जॉन कोर्निन यांच्यासह मायकल क्रेपो, थॉमस टुबरविल्ले, मायकल ली, टोनी गोंजालेस आणि जॉन  केलविन अशा सहा जणांचा समावेश आहे



भारताचे कौतुक –

भारताने कोविड महामारी ज्या पद्धतीने हाताळली, कोरोना काळात ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्याचे कौतुक अमेरिकन शिष्टमंडळाकडून करण्यात आले आहे.कोरोना हे अलिकडच्या काळी दशकातील जगावर आलेले फार मोठे संकट होते. मात्र भारत योग्य नियोजनाच्या जोरावर या संकटातून बाहेर पडल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

यासोबतच अमेरिकन शिष्टमंडळासोबत दक्षिण आशिया आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रासारख्या मुद्द्यांवर देखील चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मोदींनी ट्विट करत दिली माहिती 

या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, अमेरिकन खासदारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. या शिष्टमंडळामध्ये जॉन कोर्निन, मायकल क्रेपो, थॉमस टुबरविल्ले, मायकल ली, टोनी गोंजालेस आणि जॉन  केलविन यांचा समावेश होता. भेटीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंध अधिकाधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

India-US partnership: US delegation meets PM Modi! Discussion on many important issues including Indo-Pacific

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात