वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वदेशी सेमी कंडक्टर निर्मितीसाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून त्यासाठी ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेस मंजुरी दिली आहे. India to become Indigenous semiconductor manufacturing hub; Approval of Rs 76,000 crore scheme
वाहन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सेमी कंडक्टर्सचे म्हत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचे डिझाईन व उत्पादन भारतातच होण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ७६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. परदेशातून सेमी कंडक्टर उपलब्ध होत नसल्याने वाहन उद्योग अडचणीत आला आहे.
सहा वर्षांत सेमी कंडक्टर्सच्या बाबत देश स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी आता पावले उचलण्यात आली आहेत. भारत हे केवळ सेमी कंडक्टरच नव्हे, तर सर्वच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे प्रमुख निर्मिती केंद्र बनावे, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे देशात वाहनांचे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादनही झपाट्याने होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App