श्रीलंका दौर्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे . धवन कर्णधार असेल तर भुवनेश्वर उपकर्णधार.
प्राथमिक माहितीनुसार, भारताचा वन-डे संघ 5 जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर 28 जुलैला तो श्रीलंकेतून भारतात परतेल.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंका दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी गुरुवारी (१० जून) भारतीय संघाची घोषणा झाली आहे.यात पुणेकर ॠतुराज गायकवाडला संधी मिळाली आहे. INDIA-SHRILANKA SERIES! Team India ready for Sri Lanka tour: ‘this’ player to be captain; Opportunity for Punekar Rituraj Gaikwad
श्रीलंका दौऱ्यासाठी कॅप्टन म्हणून शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांच्यात चुरस होती. मात्र, निवड समितीने कॅप्टन पदाची जबाबदारी धवनवरच सोपवली आहे.
🚨 NEWS 🚨: The All-India Senior Selection Committee picked the Indian squad for the 3-match ODI series & the 3-match T20I series against Sri Lanka in July. #TeamIndia Details 👉 https://t.co/b8kffqa6DR pic.twitter.com/GPGKYLMpMS — BCCI (@BCCI) June 10, 2021
🚨 NEWS 🚨: The All-India Senior Selection Committee picked the Indian squad for the 3-match ODI series & the 3-match T20I series against Sri Lanka in July. #TeamIndia
Details 👉 https://t.co/b8kffqa6DR pic.twitter.com/GPGKYLMpMS
— BCCI (@BCCI) June 10, 2021
जुन महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध WTC ची फायनल मॅच खेळत असताना त्याच दरम्यान दुसरा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याच दौऱ्यासाठी बीसीसीआयने तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. ज्याचं नेतृत्व धवन आणि भुवनेश्वरकडे सोपविण्यात आलं आहे.
या दौऱ्यासाठी शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे देण्यात आले आहे. तसेच देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, चेतन सकरिया आणि कृष्णप्पा गॉथम या खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. या खेळाडूंनी आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी आपल्या खेळाडूने प्रभावित केले होते.
पृथ्वी शॉ, मनिष पांडे आणि संजू सॅमसन यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. काही दिवसांपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये अनुउत्तीर्ण झाल्याने भारतीय संघातील जागा गमवावी लागलेल्या वरुण चक्रवर्तीलाही या संघात संधी मिळाली आहे.
नेट गोलंदाज म्हणून इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग यांची निवड झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविड सांभाळणार आहे.
या दौऱ्यात ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबोमध्ये होणार आहेत.
या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू व्यस्त असणार आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा अशा काही खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. अशा परिस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात स्थान दिले आहे. तसेच विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया. नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App