Olympics 2024 : भारताचे पदकांचे खाते उघडले; नेमबाज मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पटकावले!!

वृत्तसंस्था

पॅरिस : पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारताने पदकांचे खाते उघडले.भारताची नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये ब्राँझ मेडल पटकावले. मनूने आत्तापर्यंत विश्वचषकात 9 सुवर्णपदके जिंकली पण तिला ऑलिंपिक पथकाने हुलकावणी दिली होती. मात्र तिनेच पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिले ब्राँझ मेडल मिळवून दिले. India opens its tally at Paris Olympics as shooter Manu Bhaker wins bronze medal in Women’s 10 M Air Pistol.

भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, असं मनू भाकरने (Manu Bhaker)कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह अनेकांनी मनूचे अभिनंदन केले. मनोज हरियाणातल्या घरी प्रचंड जल्लोष सुरू झाला आहे.

फायनलमध्ये मनू भाकरचा स्कोर

पहिली 5 शॉट सीरीज: 10.6, 10.2, 9.5, 10.5, 9.6, एकूण 50.4
दुसरी 5 शॉट मालिका: 10.1, 10.3, 9.6, 9.6, 10.3, एकूण: 49.9
उर्वरित शॉट्स: 10.5, 10.4, 9.8, 9.8, 9.9, 10.2, 10.1, 10.2, 10.1, 10.0, 10.1,10.3

22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.

विश्वचषकात मनू भाकरला 9 सुवर्ण

जागतिक नेमबाजीत मनू भाकरने आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.

सरबज्योत, अर्जुन यांची संधी हुकली-

सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंह चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवू शकेल नाहीत. सरबज्योत पात्रता फेरीत 577 गुणांसह नवव्या स्थानावर, तर अर्जुन 574 गुणांसह 18व्या क्रमांकावर राहिला.

रमिता जिंदालचा 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश

10 मीटर एअर रायफल महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या रमिता जिंदालने इतिहास रचत. अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. रमिता जिंदाल 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहचणारी तिसरी स्पर्धक ठरली आहे. 20 वर्षीय रमिता जिंदालने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 631.5 गुण मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. रमिता जिंदालने सहाही फेरीत 100 पेक्षा जास्त गुण मिळवले.

India opens its tally at Paris Olympics as shooter Manu Bhaker wins bronze medal in Women’s 10 M Air Pistol.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात