चांद्रयान 3 लाईव्ह स्ट्रीमिंग मध्येही भारताच्या “इस्रो”ची अमेरिकेन “नासा”वर मात!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताने चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरवून अमेरिका, रशिया, चीन या विकसित देशांवर मात केलीच आहे, पण त्या पलीकडे जाऊन चांद्रयान 3 च्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये भारताच्या “इस्रो”ने अमेरिकेच्या “नासा” अंतराळ संस्थेवर मात केली आहे. India ISRO beats American NASA even in Chandrayaan 3 live streaming

नासाच्या 2021 च्या मंगळ मोहिमेच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले होते, पण भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला तब्बल 20 लाख लोकांनी लाईक केले. भारतीय अंतराळ संशोधन विकास संस्था “इस्रो”ने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था “नासा”वर केलेली ही मात आहे.

अमेरिकेने 2021 मध्ये पर्सव्हर्न्स रोव्हर मंगळावर पाठविला. त्यावेळी “नासा”ने त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. त्या लाईव्ह स्ट्रीमिंगला 3 लाख 81 हजार लोकांनी लाईक केले होते. पण भारताच्या चांद्रयान मोहिमेला चांद्रयान 3 मोहिमेचे “इस्रो”ने केलेले लाईव्ह स्ट्रीमिंग तब्बल 20 लाख लोकांनी त्या क्षणी लाईक केले. खुद्द “इस्रो”च्या यूट्यूब चैनल वर साडेतीन लाख लोक एकाच वेळी लाईव्ह आले होते.

भारताने चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरवून विकसित देशांवर मात केलीच आहे, पण त्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये देखील अमेरिकेसारख्या विकसित देशाच्या “नासा” या अंतराळ संस्थेवर मात करून दाखवली आहे!! याचा अर्थ भारताच्या चांद्रयान मोहिमेवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते, हे सिद्ध झाले.

India ISRO beats American NASA even in Chandrayaan 3 live streaming

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात