‘BRICS’च्या मंचावर मोदींनी संपूर्ण जगाला दर्शवला भारतीय तिरंगा ध्वजाप्रतीचा आदर


जाणून घ्या नेमकं काय घडलं?, मोदींच्या  त्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विशेष प्रतिनिधी

जोहान्सबर्ग : ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. यावेळी त्यांनी ब्रिक्सच्या मंचावर भारतीय तिरंग्याबद्दल आदर व्यक्त केला. मोदींनी ब्रिक्समध्ये फोटो सेशन दरम्यान जमिनीवर पडलेला तिरंगा उचलला आणि खिशात ठेवला. At the BRICS  forum Modi showed the whole world his respect for the Indian tricolor flag

ब्रिक्समधील ग्रुप फोटोदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर भारतीय तिरंगा पडल्याचे पाहिले. हा तिरंगा कोणाच्याही पायाखालून पडू नये, म्हणून मोदींनी तो तत्काळ मंचावरून उचलला आणि खिशात ठेवला. यादरम्यान एक व्यक्ती येऊन त्याच्याकडून तिरंगा मागतो, मात्र त्या व्यक्तीला तिरंगा देण्याऐवजी मोदी तो खिशात ठेवतात, यावरून जागतिक स्तरावर त्यांचे देशावरील प्रेम दिसून येते. मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मोदी स्वतः खाली वाकून तिरंगा उचलताना दिसत आहेत.

यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनीही पंतप्रधान मोदींना पाठिंबा देताना मंचावर पडलेला दक्षिण आफ्रिकेचा ध्वज उचलला. ब्रिक्स देशांमधील एकता आणि सहकार्याची थीम असलेल्या या कार्यक्रमाने आर्थिक विकास आणि जागतिक कल्याणासाठी भारताची वचनबद्धता दर्शविली.

तत्पूर्वी, BRICS बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आणि सांगितले की देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे आणि जगासाठी एक प्रमुख विकास इंजिन बनत आहे. पंतप्रधान मोदींनी या आशावादी दृष्टिकोनाचे श्रेय सध्या सुरू असलेल्या “मिशन-मोड” सुधारणांना दिले ज्याने भारतात व्यवसाय करण्याच्या सुलभतेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे.

At the BRICS  forum Modi showed the whole world his respect for the Indian tricolor flag

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात