भारताचा चंद्र दक्षिण दिग्विजय; विकसित देशांवर मात!!; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवणारा जगातला ठरला पहिला देश!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे चांद्रयान 3 चंद्रभूमीवर उतरले हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी महान यशाचा दिवस आहे. पण त्या पलीकडे जाऊन भारताचा चंद्र दक्षिण दिग्विजय हा भारतासारख्या विकसनशील देशाने अंतराळ दादागिरी करणाऱ्या विकसित देशांवर मात करण्याचे प्रतीक ठरले आहे!! It became the first country in the world to hoist the tricolor on the South Pole of the Moon

जगातल्या कोणत्याही विकसित देशाला अद्याप जे साध्य करता आले नाही, ते भारताने चांद्रयान 3 मोहिमेत साध्य करून दाखविले आहे, ते म्हणजे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारताने चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले आहे!! आत्तापर्यंत कोणत्याही विकसित देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवता आलेले नाही. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. चांद्रयान 3 मोहिमेचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे

आत्तापर्यंत 4 देशांनी 12 चंद्र मोहिमा यशस्वी केल्या आहेत. पण अमेरिका, रशिया, चीन यांना जे जमले नाही ,ते भारताने करून दाखविले आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित आणि निर्मित चांद्रयान 3 हे भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरवले आहे.

भारताची ही मोहीम 2019 मध्येच यशस्वी होणे अपेक्षित होते. परंतु त्यावर्षी या मोहिमेला यश मिळाले नाही. त्यानंतर चांद्रयानात आधीच्या अपयशांना गृहीत धरून भरपूर तांत्रिक सुधारणा केल्या. त्यासाठी शेकडो शास्त्रज्ञ दिवस-रात्र खपले आणि त्यातून चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी करू शकले.

रशियाची मोहीम फसली

काहीच दिवसांपूर्वी रशियाची चांद्र मोहीम फसली. रशियाला आपले यान चंद्रावर उतरवण्यापूर्वीच गमवावे लागले. कारण रशियन शास्त्रज्ञ त्यावर नियंत्रण टिकवू शकले नाहीत. रशिया सारख्या विकसित देशाला त्यांच्या चांद्र मोहिमेत अपयश आले. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे यश ठळकपणे उठून दिसत आहे.*

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

याचा वेगळ्या अर्थाने उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात आज केला. दक्षिण आफ्रिकेतून भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना त्यांनी भारताच्या अमृतकालात पहिल्या किरणांच्या साक्षीने भारताने नव्या अंतराळ युगात प्रवेश केल्याची ग्वाही दिली. जगातला कोणताही विकसित देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक आपले यान उतरवून शकला नसल्याचा आवर्जून उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला, पण त्याचवेळी आपले चांद्रयान 3 मोहिमेचे यश हे जागतिक पातळीवरचे यश आहे. भारताच्या “एक विश्व, एक कुटुंब” या संकल्पनेला पुढे नेणारे यश आहे, हे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. भारताचा चंद्र दक्षिण ध्रुवावरील विजय हा त्यांनी 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे.

It became the first country in the world to hoist the tricolor on the South Pole of the Moon

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!