इंडिया एनर्जी वीक 2024 मध्ये पंतप्रधान मोदींचं विधान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गोव्यातील इंडिया एनर्जी वीक 2024 मध्ये जागतिक नेत्यांना संबोधित केले. मोदी म्हणाले, “भारतीय ऊर्जा सप्ताहाचा हा कार्यक्रम गोव्यात आयोजित केला जात आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. गोवा हे पाहुणचारासाठी ओळखले जाते. जगभरातून येथून पर्यटक येत आहेत, संपूर्ण जग या ठिकाणच्या सौंदर्याने आणि संस्कृतीने प्रभावित झाले आहे.”‘India is the fastest growing economy in the world’, PM Modi said at India Energy Week 2024
मोदी म्हणाले की, गोवा हे राज्य आहे जे विकासाच्या नवीन आदर्शांना स्पर्श करत आहे, म्हणून आज जेव्हा आपण पर्यावरण संवेदनशीलता आणि शाश्वत भविष्याबद्दल बोलण्यासाठी एकत्र आलो आहोत, तेव्हा गोवा हे एक आदर्श राज्य आहे. यासाठी या शिखर परिषदेला येणारे सर्व परदेशी पाहुणे त्यांच्यासोबत गोव्याच्या आयुष्यभराच्या आठवणी घेऊन जातील…”
इंडिया एनर्जी वीक 2024 मध्ये मोदी म्हणाले, ‘आज आपण पर्यावरणाप्रती संवेदनशीलतेबद्दल बोलण्यासाठी एकत्र आलो आहोत. जर तुम्ही शाश्वत भविष्याबद्दल बोलणार असाल, तर त्यासाठी गोवा हे योग्य ठिकाण आहे.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन अत्यंत महत्त्वाच्या काळात केले जात आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताचा जीडीपी दर साडेसात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक विकासदराच्या अंदाजापेक्षा हा दर खूपच जास्त असल्याचे आणि भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. असे मोदींनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App