Union Minister Naqvi : तालिबानने नुकतेच काश्मीरसंदर्भात एक वक्तव्य केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आम्हाला काश्मीरच्या मुस्लिमांसाठीही आवाज उठवण्याचा अधिकार आहे, असे तालिबानने म्हटले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शुक्रवारी म्हटले की, भारतात संविधानाचे पालन केले जाते, येथे मशिदीतील उपासकांना गोळ्या आणि बॉम्बने मारले जात नाही किंवा मुलींना शाळेत जाण्यापासून रोखलेही जात नाही. India follows Constitution Union Minister Naqvi shows mirror to Taliban over raising voice for Muslims in Kashmir remark
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तालिबानने नुकतेच काश्मीरसंदर्भात एक वक्तव्य केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आम्हाला काश्मीरच्या मुस्लिमांसाठीही आवाज उठवण्याचा अधिकार आहे, असे तालिबानने म्हटले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शुक्रवारी म्हटले की, भारतात संविधानाचे पालन केले जाते, येथे मशिदीतील उपासकांना गोळ्या आणि बॉम्बने मारले जात नाही किंवा मुलींना शाळेत जाण्यापासून रोखलेही जात नाही.
तालिबान दहशतवादी गटाने म्हटले आहे की, काश्मीरसह कुठेही मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा त्यांना अधिकार आहे. तथापि, त्यांनी असे म्हटले आहे की कोणत्याही देशाविरोधात सशस्त्र लढा उभारण्याचे धोरण या गटाकडे नाही.
एएनआयशी बोलताना नक्वी म्हणाले, “मी त्यांना ( तालिबान) हात जोडून आवाहन करतो की, त्यांनी भारतातील मुस्लिमांची चिंता सोडावी. येथे मशिदींमध्ये प्रार्थना करणाऱ्या उपासकांवर गोळ्या आणि बॉम्बने हल्ला केला जात नाही. येथे मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जात नाही. त्यांचे शिर व पाय कापले जात नाहीत. या देशाच्या सरकारचे शास्त्र हे संविधान आहे आणि देश त्याचे पालन करतो.”
ते म्हणाले, “संविधान सर्वसमावेशक विकासाची हमी देते, प्रत्येकाच्या सहकार्याची हमी देते आणि देश त्याद्वारे चालतो.”
बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले होते की, “काश्मीर, भारत आणि इतर कोणत्याही देशात मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला मुस्लिम म्हणून अधिकार आहे. आम्ही आमचा आवाज उठवू आणि सांगू की मुसलमान तुमचे स्वतःचे लोक आहेत, तुमचे स्वतःचे नागरिक आहेत. त्यांना तुमच्या कायद्यांनुसार समान अधिकार मिळतील.”
India follows Constitution Union Minister Naqvi shows mirror to Taliban over raising voice for Muslims in Kashmir remark
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App