तालिबान सरकारच्या स्थापनेपूर्वी ISI प्रमुख काबूलला पोहोचले, पाकिस्तानी राजदूताला भेटण्याचे निमित्त

Pakistan Secret Intelligence Agency ISI Chief Faiz Hameed Reaches Kabul Just As Taliban Is Expected To Announce Its Government In Afghanistan

ISI Chief Faiz Hameed Reaches Kabul : तालिबान लवकरच अफगाणिस्तानात आपल्या सरकार स्थापनेची घोषणा करणार आहे. तालिबानचे उच्चपदस्थ नेत्यांनी पाकिस्तानशी संबंध नाकारलेले आहेत, परंतु दोघांमधील घनिष्ठ संबंध आता उघड होऊ लागले आहेत. या वेळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद काबूलला पोहोचले आहेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन होण्यापूर्वी अशा प्रकारे पाकिस्तानी अधिकाऱ्याचे आगमन बरेच काही स्पष्ट करते. विशेषतः अफगाणिस्तानातून अमेरिकेला माघार घ्यायला लावण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे मानले जात आहे. Pakistan Secret Intelligence Agency ISI Chief Faiz Hameed Reaches Kabul Just As Taliban Is Expected To Announce Its Government In Afghanistan


वृत्तसंस्था

काबूल : तालिबान लवकरच अफगाणिस्तानात आपल्या सरकार स्थापनेची घोषणा करणार आहे. तालिबानचे उच्चपदस्थ नेत्यांनी पाकिस्तानशी संबंध नाकारलेले आहेत, परंतु दोघांमधील घनिष्ठ संबंध आता उघड होऊ लागले आहेत. या वेळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद काबूलला पोहोचले आहेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन होण्यापूर्वी अशा प्रकारे पाकिस्तानी अधिकाऱ्याचे आगमन बरेच काही स्पष्ट करते. विशेषतः अफगाणिस्तानातून अमेरिकेला माघार घ्यायला लावण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे मानले जात आहे.

आयएसआयच्या प्रमुखांसह आणखी बरेच लष्करी अधिकारीही अफगाणिस्तानात पोहोचले आहेत. सध्या त्यांना काबूलमधील सेरेना हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे, येथे या टीमने पाकिस्तानी राजदूतांना भेटण्याचे निमित्त केले. मात्र, काही फोटो आधीच सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात आयएसआय प्रमुख तालिबान प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरदार यांच्यासोबत दिसत आहेत.

पाकिस्तानी नेत्यांनी कबूल केले आहे तालिबानशी संबंध

खुद्द पाकिस्ताननेही अनेक प्रसंगी तालिबानचे समर्थन मान्य केले आहे. इम्रान सरकारचे गृहमंत्री शेख रशीद यांनी अलीकडेच कबूल केले की, इस्लामाबाद बराच काळापासून तालिबानचा संरक्षक आहे. रशीद म्हणाले होते की, आम्ही संघटनेला आश्रय देऊन बळकट करण्याचे काम केले, त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता की 20 वर्षांनंतर हा गट पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर राज्य करतोय. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते की, इस्लामाबाद अफगाणिस्तानला पाठिंबा देण्यासाठी विधायक भूमिका बजावेल. दुसरीकडे, खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानातून अमेरिका निघून जाण्यावर आणि तालिबानी राजवटीच्या आगमनावर आनंद व्यक्त केला होता.

तालिबानच्या दृष्टीने पाकिस्तान दुसरे घर

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद म्हणाले की, तालिबान पाकिस्तानला आपले दुसरे घर मानतो आणि पाकिस्तानच्या हिताच्या विरोधात असलेल्या अफगाणिस्तानच्या भूमीवर कोणत्याही कृतीला परवानगी देणार नाही. मात्र, आम्ही आमची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही, असेही मुजाहिद म्हणाले. भारत आणि पाकिस्तानने त्यांचे द्विपक्षीय प्रश्न सोडवले पाहिजेत.

Pakistan Secret Intelligence Agency ISI Chief Faiz Hameed Reaches Kabul Just As Taliban Is Expected To Announce Its Government In Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*