विशेष प्रतिनिधी
तेल अविव – सागरी सुरक्षेसह विविध क्षेत्रांतील संभाव्य पायाभूत प्रकल्पांबाबत भारत, इस्राईल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिराती या चार देशांत चौफेर चर्चा झाली.परराष्ट्र मंत्री पातळीवरील चर्चा व्हर्च्युअल माध्यमातून झाली. यात वाहतूक, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि व्यापार अशा क्षेत्रांचा यात समावेश आहे.India discus various issues with USA and Israyal
भारताचे डॉ. एस. जयशंकर, इस्राईलचे याईर लॅपीड, अमिरातीचे अब्दुल्ला बीन झायेद अल् नाह्यान व अमेरिकेचे अँटोनी ब्लिंकन यांनी यात भाग घेतला. अतिरिक्त संयुक्त प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. आर्थिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उभारण्याचा निर्णय झाला.
इस्राईलच्या लॅपीड यांनी वॉशिंग्टन भेटीदरम्यान अशा बैठकीसाठी पुढाकार घेतला. या बैठकीच्या प्रारंभी ते म्हणाले की, या व्यासपीठावर क्षमता, ज्ञान आणि अनुभव यांचा अनोखा संच आहे. याचा वापर करून आपण एक यंत्रणा निर्माण करू शकतो,
जिची उभारणी झालेली पाहण्याचे आपले ध्येय आहे. आमच्यात समन्वय निर्माण करण्याची प्रक्रिया या बैठकीपासून सुरु झाली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा, डिजिटल सुविधा भक्कम करण्यासाठी एकत्रित कार्य करणे शक्य होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App