विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पहिले सहा टप्पे ओलांडल्यानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीने 310 आकडा पार केल्याचा दावा केला, पण काँग्रेस प्रणित INDI आघाडीच्या प्रवक्त्यांनी भाजप 180 वर गुंडाळला जाईल, असा प्रतिदावा केला.INDI alliance leaders avoid discussions on prime ministerial candidates, but disciples throws their leaders hat in the race
या आकड्यांच्या गदारोळात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी कडून पंतप्रधान कोण होणार हे निश्चित आहे. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडीने निवडणुका लढवल्या आहेत मोदींनी 400 पारचा नारा देऊन भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे.
या पार्श्वभूमीवर INDI आघाडीमध्ये मीडिया मधले नॅरेटिव्ह या खेरीज दुसरा कुठलाही आधार दिसत नाही, पण तरी देखील मोदीविरोधात नेमके कोण म्हणजेच INDI आघाडीतून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण??, या विषयावर बोलायला मात्र INDI आघाडीचे नेते कचरत आहेत. ते जाहीरपणे कोणाचेही नाव घेत नाहीत. अगदी INDI आघाडीतला सगळ्यात मोठा घटक पक्ष काँग्रेस नेते देखील राहुल गांधींचे नाव घेताना अतिशय सावधतेने हळूच शब्द उच्चारतात. त्या पलीकडे जाऊन बाकीच्या पक्षांचे अतिवरिष्ठ नेते त्या विषयाला हातच घालत नाहीत. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, एम. के. स्टालिन यांच्यासारखे नेते पंतप्रधान हा विषय आपल्या चर्चेत आणत नाहीत. त्यांना कोणी त्यासंबंधी प्रश्न विचारला तर चर्चेतून पंतप्रधान निवडून एवढेच उत्तर देऊन ते दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळतात.
त्या उलट त्यांचे अनुयायी मात्र आपापल्या नेत्यांच्या टोप्या पंतप्रधान पदाच्या रिंगणात टाकायचे मात्र सोडत नाही. याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातल्या निवडणूक प्रचारात आला. समाजवादी पार्टीचे कप्तानसिंग लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आणि आमदार कवींद्र चौधरी यांनी अखिलेश यादव यांची टोपी पंतप्रधान पदाच्या रिंगणात टाकून दिली. म्हणजे त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदासाठी INDI आघाडीतून अखिलेश यादव यांचेच नाव योग्य असल्याचे जाहीर करून टाकले. अखिलेश यादव हे ऑस्ट्रेलियात शिकले आहेत. त्यामुळे शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत कुठलीही शंका नाही. त्यांना सरकार चालविण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे तेच पंतप्रधान पदासाठी INDI आघाडीतून योग्य उमेदवार ठरू शकतात, असा दावा कवींद्र चौधरी यांनी केला.
आत्तापर्यंत ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, एम. के. स्टालिन यांच्या अनुयायांनी त्यांच्या टोप्या पंतप्रधान पदाच्या रिंगणात टाकूनच ठेवल्या आहेत. त्या पाठोपाठ अखिलेश यादव यांची टोपी त्यांच्या कट्टर अनुयायाने पंतप्रधानपदाच्या रिंगणात टाकून ठेवली आहे, पण फक्त प्रश्न हा आहे, की अगदी मोदी हरले तरी INDI आघाडी 272 ची मॅजिक फिगर गाठणार का??, हा प्रश्न कवींद्र चौधरींना कुणी विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App