चालकासह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले ; संतप्त जमावाने कारची तोडफोड केली
विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रात वेगाचा कहर काही थांबत नाही. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता नागपुरातही अनियंत्रित कारने एका लहान मुलासह ३ जणांना धडक दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कोतवाली पोलीस हद्दीतील जेंडा चौक परिसरात घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणात कारची तोडफोड केली.After Pune an uncontrolled car hit 3 people in Nagpur too
बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या चालकासह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला, तीन वर्षांचा बालक आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागपूरचे डीसीपी गोरख भामरे म्हणाले, ‘कोतवाली पोलिस ठाण्याच्या जेंडा चौक परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास एका भरधाव कारने महिला, तिचे मूल आणि अन्य एका व्यक्तीला धडक दिली, त्यात ते दोघे जखमी झाले. लोकांनी एका आरोपीला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुण आणि कार चालकाला ताब्यात घेतले आहे. कारमधून दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more