विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी 400 पार जाणार की नाही की मोदी 300 च्याच आत अडकेल?? यावरच मीडिया सध्या बाता मारतोय. विरोधक त्या बातांवरच झुलत आहेत, पण त्यांनी अजून त्रिशंकू लोकसभा येईल असे त्यांचे लाडके नॅरेटिव्ह चालवलेले नाही, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खान मार्केट गँगच्या वर्मावर बोट ठेवले. PM Modi asserts, khan market gang dare not predict hung loksabha now!!
दूरदर्शन ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मोदी म्हणाले 2014 पूर्वी खान मार्केट गँगचे लाडके नॅरेटिव्ह होते, की काँग्रेस सत्तेवर येणार नसेल, तर त्रिशंकू लोकसभा येईल त्यामुळे देशात अस्थिर सरकार येईल, पंतप्रधान पदासाठी, मंत्रिपदांसाठी भांडणे होतील, अशी भाकिते खान मार्केट गॅंग करत असे. पण 2014 नंतर खान मार्केट गॅंगच्या या भाकितांना चाप बसला.
2014 मध्ये त्यावेळच्या सरकारविरुद्ध प्रचंड रोष होता. कारण ते सरकारच विस्कळीत होते. सरकारला पंतप्रधान होते, पण त्यांच्यावरती एक सुपर पंतप्रधान होते. त्या सरकारच्या आघाडीतल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपणच पंतप्रधान असल्याचे वाटत असे. त्यामुळे कोणी कोणाला विचारायची हिंमतच करत नव्हते. खान मार्केट गँगला देखील देश असाच चालतो असे वाटत असे. ते नॅरेटिव्ह सेट करण्यात हुशार झाले होते.
पण 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा धक्का बसला. कारण भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. 2019 मध्ये सरकारच्या परफॉर्मन्सच्या आधारे भाजपच्या जागा वाढल्या त्यामुळे देशात त्रिशंकू लोकसभेचे खान मार्केट गँगने तयार केलेले नॅरेटिव्ह त्यांच्याच लक्षात राहिले नाही. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत त्रिशंकू लोकसभा येऊ शकेल, असे भाकीत करायला ते धाजावलेच नाही, असा टोला पंतप्रधान मोदींनी खान मार्केट गॅंगला हाणला
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more