INDI आघाडीची सोडली आशा; काँग्रेस एकटीच लढण्याचा खर्गेंचा इशारा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : INDI आघाडीची सोडली अशा काँग्रेसला एकटाच लढण्याचा द्यावा लागला इशारा!!, अशी अवस्था खरंच काँग्रेसची झाली आहे. INDI Abandoned Hope Kharge warns Congress to fight alone

ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस, अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष या दोघांनी बंगाल, पंजाब आणि दिल्ली या राज्यांमध्ये काँग्रेसला ठेंगा दाखवल्यानंतर काँग्रेसला तसेही लोकसभा निवडणुकीसाठी एकट्याने लढण्याशिवाय पर्याय उरलाच नव्हता. त्याची कबुली आज स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देऊन टाकली. पंजाब मधल्या लुधियाना जिल्ह्यातील समराला येथे बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी बाकी कोणी आमच्याबरोबर आले, तर उत्तम. नाही आले तर आम्ही एकटेच भाजप विरुद्ध लढायला तयार आहोत, असे सांगून टाकले.

आम आदमी पार्टीने पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेसला एकही जागा सोडणार नसल्याचे कालच सांगून टाकले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब मध्ये जाऊन तशी घोषणाच केली होती. त्यामुळे काँग्रेसला एकाकी लढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंजाब मध्ये जाऊन त्या एकाकी लढण्याचे कबुली दिली, पण ती कबुली देताना मात्र त्यांनी इशारा देण्याची भाषा वापरली.

काँग्रेसला आता फक्त महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, तामिळनाडू एम. के. स्टालिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम याच पक्षांची आशा उरली आहे. या पक्षांनी आघाडी न तोडता आपापल्या राज्यांमध्ये निवडणूक लढवली, तर काँग्रेसला आपणच तयार केलेली INDI आघाडी किमान दोन मोठ्या राज्यांमध्ये टिकवल्याचे समाधान मिळणार आहे.

INDI Abandoned Hope Kharge warns Congress to fight alone

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात