भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मुंबईहून रवाना झाली आहे. बीसीसीआयने संघाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. IND vs SA: Team India leaves for South Africa; Virat Kohli OUT from BCCI photos …
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली. टीम इंडिया गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे. भारतीय संघाला 26 डिसेंबरपासून यजमानांसोबत 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या फ्लाइटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
BCCI ने 4 फोटो शेअर केले आहेत, ज्यात जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव दिसत आहेत, पण BCCI च्या या फोटोंमध्ये विराट कोहली दिसत नाहीये. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 39 कसोटी सामने खेळले गेले आहेत या 39 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 15 सामने जिंकले असून भारताने 14 सामने जिंकले आहेत, तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App