भारताच्या यशात सर्वात मोठा वाटा सलामीवीर शेफाली वर्मा (205 धावा) आणि स्मृती मानधना (149 धावा) यांचा होता.
विशेष प्रतिनिधी
भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारली. चेन्नईमधील एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिला डाव 6 बाद 603 धावांवर घोषित केला. यासह भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला.IND vs SA Indian womes team breaks Australias record for highest score in Test cricket
खरे तर आतापर्यंत महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नऊ विकेट्सवर 575 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये ही कामगिरी केली होती. ॲन डर्कसेनच्या 109व्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवर रिचा घोष (86 धावा) हिने चौकार ठोकून भारताने नवा विक्रम केला.
कर्णधार हरमनप्रीत कौर (६९ धावा) आणि रिचासह जेमिमाह रॉड्रिग्स (५५ धावा) यांनी अर्धशतक झळकावत योगदान दिले. भारतीय महिला संघाने पहिल्या दिवशी चार गड्यांच्या मोबदल्यात 525 धावा केल्या होत्या, ही कसोटी सामन्यातील एका दिवसातील सर्वोच्च धावसंख्या देखील होती.
भारताच्या यशात सर्वात मोठा वाटा सलामीवीर शेफाली वर्मा (205 धावा) आणि स्मृती मानधना (149 धावा) यांचा होता. दोघींमध्ये 292 धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली. महिला क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीही ही सर्वात मोठी भागीदारी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App