भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने आपल्या १२ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेद्वारे याची घोषणा केली.IND vs PAK T20 World Cup 2021 Pakistan announce playing Eleven against India
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने आपल्या १२ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेद्वारे याची घोषणा केली.
सरफराजला डच्चू
पाकिस्तान संघात बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैरिस रौफ यांचा त्यांच्या १२ खेळाडूंमध्ये समावेश होता. संघाने माजी कर्णधार सर्फराज अहमदचा या 12 खेळाडूंमध्ये समावेश केलेला नाही.
Pakistan's 12 for their #T20WorldCup opener against India.#WeHaveWeWill pic.twitter.com/vC0czmlGNO — Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2021
Pakistan's 12 for their #T20WorldCup opener against India.#WeHaveWeWill pic.twitter.com/vC0czmlGNO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2021
सरफराजला टी -20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघातही स्थान मिळाले नाही, पण नंतर त्याला 15 जणांच्या संघात स्थान मिळाले. सरफराज हा संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला या सामन्यात अनुभव खेळाडूची कमतरता जाणवू शकते.
शोएब मलिकची पुन्हा एंट्री
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शोएब मलिकने अंतिम 12 मध्ये पुनरागमन केले आहे. मलिक जवळपास वर्षभरापूर्वी राष्ट्रीय संघाकडून अखेरचा खेळला होता. शोएब 2007 पासून 5 टी -20 विश्वचषक खेळला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22 वर्षांचा अनुभव आहे. टी-20 विश्वचषकाच्या 28 सामन्यांमध्ये मलिकने 32.11 च्या सरासरीने 546 धावा केल्या आहेत.
भारताकडून सतत हरला आहे पाकिस्तान
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ भारताला कधीही हरवू शकला नाही. T20 विश्वचषकात दोन्ही संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत. या सर्व वेळी भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. यावेळीही भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे.
एकदिवसीय विश्वचषकातही भारताचे वर्चस्व
टी-20 व्यतिरिक्त एकदिवसीय विश्वचषकातही टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध शंभर टक्के रेकॉर्ड आहे. 1992 ते 2019 या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 50-50 षटकांचे एकूण सात सामने खेळले गेले आहेत आणि भारतीय संघाने सर्व जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App