Income Tax Department : सीबीडीटीने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने टेक्सटाइल आणि फिलामेंट यार्नची निर्मिती करणाऱ्या एका प्रमुख व्यावसायिक समूहावर छापा टाकून परदेशातील कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा उघड केला आहे. 18 सप्टेंबर रोजी कंपनीच्या दिल्ली, पंजाब आणि कोलकाता येथील कॉर्पोरेट कार्यालयांत आणि समूहाच्या इतर ठिकाणी छापेमारी झाली. Income Tax Department detects blackmoney abroad after raids on textile group
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीबीडीटीने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने टेक्सटाइल आणि फिलामेंट यार्नची निर्मिती करणाऱ्या एका प्रमुख व्यावसायिक समूहावर छापा टाकून परदेशातील कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा उघड केला आहे. 18 सप्टेंबर रोजी कंपनीच्या दिल्ली, पंजाब आणि कोलकाता येथील कॉर्पोरेट कार्यालयांत आणि समूहाच्या इतर ठिकाणी छापेमारी झाली.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने एका निवेदनात म्हटले आहे की, या गटाने आपल्या परदेशी खात्यांमध्ये सुमारे 350 कोटी रुपयांचा बेनामी रक्कम जमा केली आणि नंतर टेक्स हेव्हन देशांतील शेल कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील आपल्या व्यवसायात तो पाठवला. सीबीडीटीने म्हटले की, छाप्यांमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांचे कामकाज परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीशी संबंधित आहे. या छाप्यांमध्ये असे उघड झाले आहे की कंपनीने विदेशी कंपन्यांना परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांद्वारे भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवले होते आणि नंतर ते देयकात डिफॉल्टच्या नावाखाली कंपनीच्या शेअर्समध्ये रूपांतरित केले होते.
आयकर विभागाने सांगितले की, छाप्यादरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे, डायरी, डिजिटल पुरावे सापडले आहेत. यावरून समूहाची परदेशात खाती आहेत आणि त्यात जमा केलेले बेनामी निधी भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवले गेले आहेत, हे दिसून येते. परदेशी बँक खात्यांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली नव्हती.
कर विभागाने दावा केला आहे की, कंपनीने आपल्या खात्याच्या पुस्तकांबाहेर व्यवहार केले आहेत, जमिनीच्या व्यवहारांमध्ये रोख व्यवहार केले आहेत, खाते पुस्तकांमध्ये फसवणुकीचा खर्च दर्शविला आहे आणि बेहिशेबी रोख खर्च दडपला आहे.
Income Tax Department detects blackmoney abroad after raids on textile group
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App