युक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती, बॉम्ब वर्षावामुळे मृतदेह पुरतात चक्क अंगणात आणि उद्यानातही


वृत्तसंस्था

किव्ह : रशिया-युक्रेन युध्‍द:रशियाच्या बॉम्बवर्षावामुळे युक्रेनमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्याने, अंगणात मृतदेहांचे दफनविधी केले जात असून , कबरीवरील नावावरून आप्ताची ओळख पटवण्याची वेळ आली आहे. In Ukraine bury corpses in courtyards and parks

युक्रेनचे शहर ताब्यात घेण्यासाठी रशियाने मारियूपोलवर बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. मृतदेहांना स्मशानभूमीत नेणे कठीण असल्यामुळे उद्याने, खेळाची मैदाने व घरांच्या अंगणात दफन करावे लागत आहेt. रशियाच्या हल्ल्यांमुळे संवाद यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे इतर देशांत राहणारे लोक नातेवाइकांची माहिती देखील घेऊ शकत नाहीत.



युक्रेनमध्ये काम करणारे लोक मृत्युमुखी पडलेल्यांची तसेच देश सोडून जाणाऱ्यांच्या नावाची यादी सोशल मीडियावर जाहीर करू लागले आहेत. अनेक नातेवाइकांना मृत्यूची माहिती देखील कबरीच्या छायाचित्रावरून समजून घ्यावी लागत आहे. पाेलंडमध्ये आश्रयाला असलेलीओलेना मॅकाय यांना भावाच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियातून मिळाली.

युक्रेनच्या लोकांना बळजबरी नेले

युक्रेनच्या नागरिकांचे पासपोर्ट,ओळखपत्र घेऊन रशियन सैनिक त्यांना बळजबरी रशियाच्या सीमेवर पाठवून दिले जात आहे, असे मारियूपोलचे लोक सांगतात. आतापर्यंत त्या भागात युक्रेनच्या तीन हजार नागरिकांना नेण्यात आले आहे. त्यांना रशियन ओळखपत्रही दिले जात आहे. युक्रेनच्या जनतेला मदत केल्याचा खोटा दावा देखील करू लागले आहे.

In Ukraine bury corpses in courtyards and parks

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात