कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. या जीवघेण्या साथीने सर्वसामान्यांनाच नव्हे तर राजकारणी आणि अभिनेत्यांनाही वेठीस धरले. मंगळवारी, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना म्हणाले की, महामारीच्या तिसऱ्या लाटेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे तेरा न्यायाधीश आणि 400 न्यायालयीन कर्मचारी कोरोना संक्रमित झाले होते. विशेष म्हणजे, आपला खटला रजिस्ट्रीद्वारे सुनावणीसाठी ताबडतोब सूचीबद्ध करण्यात आला नसल्याची तक्रार वकिलाने केल्यानंतर सीजेआय यांनी हा खुलासा केला. In the third wave of corona, 400 employees including 13 judges of the Supreme Court tested positive, the Chief Justice said
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. या जीवघेण्या साथीने सर्वसामान्यांनाच नव्हे तर राजकारणी आणि अभिनेत्यांनाही वेठीस धरले. मंगळवारी, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना म्हणाले की, महामारीच्या तिसऱ्या लाटेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे तेरा न्यायाधीश आणि 400 न्यायालयीन कर्मचारी कोरोना संक्रमित झाले होते. विशेष म्हणजे, आपला खटला रजिस्ट्रीद्वारे सुनावणीसाठी ताबडतोब सूचीबद्ध करण्यात आला नसल्याची तक्रार वकिलाने केल्यानंतर सीजेआय यांनी हा खुलासा केला.
CJI रमणा यांनी वकिलाला सांगितले, “जर तुम्हाला समस्या माहिती नसेल, तर आम्ही काय करावे? रजिस्ट्रीमध्ये चारशे लोकांना कोविड झाला आणि 13 न्यायाधीशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. आमचे शरीर सहकार्य करत नसतानाही आम्ही बसून खटल्यांची सुनावणी करत होतो. तुम्हाला हे ठाऊक पाहिजे.”
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह ३२ न्यायाधीश कार्यरत आहेत. यात सुमारे 3,000 न्यायालयीन कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयात 3 जानेवारीपासून आभासी पद्धतीने सुनावणी सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App