तिरंगी सजावटीत रंगला सावळा विठुराया , तब्बल 750 किलो फुलांनी केली सजावट


पुण्याच्या या विठ्ठल भक्तांनी 35 हजार रुपये खर्च करुन सुमारे 750 किलो फुले उपलब्ध करुन दिली आहेत.Vithuraya, a colorful shade in triangular decoration, decorated with 750 kg of flowers


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा तिरंगी फुलांची आणि पानांनी सजावट करण्यात आली.विशेष म्हणजे तिरंगी सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन देखील विठूरायाच्या मंदिरातील तिरंगी सजावट भाविकांना पाहता येत आहे.

दरम्यान आजच्या सजावटीसाठी पुण्याच्या सचिन आण्णा चव्हाण, संदिप वि.पोकळे, विक्रम भुरुक, राहुल ब.पोकळे, संतोष ल.पोकळे आणि भोलेश्वर पोकळे या विठ्ठल भक्तांनी 35 हजार रुपये खर्च करुन सुमारे 750 किलो फुले उपलब्ध करुन दिली आहेत.

अशी माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. शिंदे ब्रदर्स साई डेकोरेटर्स पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे. भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत आहे.

Vithuraya, a colorful shade in triangular decoration, decorated with 750 kg of flowers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात