गुजरातमध्ये आश्चर्य : ७० व्या वर्षी महिला बनली माता; लग्नानंतर ४५ वर्षांनी दिला बाळाला जन्म

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातमध्ये एक महिला तब्बल ७० व्या वर्षी माता बनली आहे. लग्नाला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात वृद्ध माता बनण्याचा मानही तिने पटकावला आहे. In surprising news from Kutch, Gujarat, a 70 year old woman gave birth to her first child after 45 years of marriage



गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. महिन्याभरापूर्वी तिने बाळाला जन्म दिला. जीवूबेन वालाभाई, असे त्या महिलेचे नाव आहे. दांपत्याला कित्येक वर्षे मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या सहकार्याने दांपत्याला पहिले आपत्य झाले. महिलेचे वय हा कळीचा मुद्दा होता. पण, त्यावर मात करण्यात डॉक्टरांनी यश प्राप्त केले.आठ महिन्यांच्या गर्भवती असताना तिने बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.

In surprising news from Kutch, Gujarat, a 70 year old woman gave birth to her first child after 45 years of marriage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात