Jogeshwari : जोगेश्वरीतील गोमती वैशाली चाळीत भीषण आग; 11 जण जखमी, दोन वृद्धांची प्रकृती गंभीर; इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील आगीमुळे दुर्घटना

Jogeshwari

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Jogeshwari  जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Jogeshwari

पहाटेच्या सुमारास लागली आग

मुंबई अग्निशमन दलाकडून (MFB) मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील हाजी जुहू रोड, वैशाली नगर येथील ‘गोमती वैशाली चाळ’ या तळमजला अधिक सहा मजले (G+6) असलेल्या इमारतीत ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे ५:५९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील सामायिक मीटर केबिनमधील इलेक्ट्रिक वायरिंग आणि उपकरणांना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही मिनिटांत, म्हणजेच सकाळी ६:१८ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.Jogeshwari



धुरामुळे रहिवाशांना बाधा

आग केवळ मीटर केबिनपुरती मर्यादित असली तरी, आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. झोपेत असलेल्या रहिवाशांना या धुराचा मोठा त्रास झाला. सुरुवातीला केवळ दोघांना धुराची बाधा झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, एकूण ११ रहिवासी या घटनेत जखमी झाले आहेत. यामध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.

जखमींची नावे आणि सद्यस्थिती

आगीत होरपळल्यामुळे एका वृद्ध दाम्पत्याला पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, उर्वरित ९ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

सलीम नूर मोहद्दीन तडवी (पुरुष, ७५ वर्षे) आणि मुमताज सलीम तडवी (महिला, ६७ वर्षे) यांची दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल जखमी लोक (प्रकृती स्थिर)

युसूफ मीठा (पुरुष, ५५ वर्षे)
समीरा मीठा (महिला, ५५ वर्षे)
इरफान मीठा (पुरुष, ४६ वर्षे)
बिल्किस मीठा (महिला, ७० वर्षे)
मोहम्मद आमीर मीठा (पुरुष, ८० वर्षे)
हुसा मीठा (पुरुष, ४० वर्षे)
इरफा मीठा (मुलगा, १३ वर्षे)
मेहरागिज बाटावाला (महिला, ६४ वर्षे)
अली अशद बाटावलकर (पुरुष, ३३ वर्षे)

पावसाळ्याच्या दिवसांत इमारतींच्या मीटर केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे सोसायट्यांनी आणि नागरिकांनी मीटर बॉक्स व इलेक्ट्रिक वायरिंगची योग्य निगा राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jogeshwari Building Fire: 11 Injured After Blaze Erupts in Electric Meter Cabin

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात