Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण; सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Ketan Agarwal Case

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ketan Agarwal Case केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली.Ketan Agarwal Case

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज दोन्ही आरोपींना दुपारी वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासातील नवीन धागेदोरे आणि मोबाईलमधील ‘सांकेतिक भाषेचा’ (कोडवर्ड) हवाला देत आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायाधीश ए. एम. विभुते यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आणि दोन्ही आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.Ketan Agarwal Case



कोर्टात काय झाले?

गेल्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत तपास यंत्रणांनी अनेक महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केल्याची माहिती न्यायालयात दिली. घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींनी गुन्ह्यापूर्वी सराव केलेल्या ठिकाणाची पाहणी, फाडून टाकलेल्या पासपोर्टशी संबंधित ठिकाणाचा पंचनामा आणि आरोपींचे कपडे जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. सिया गोयलचा दुसरा मोबाईलही जप्त करण्यात आला असून, त्यातून डिलीट केलेला डेटा पोलिसांनी पुन्हा मिळवला आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या रिकव्हर केलेल्या चॅट्समध्ये आरोपींनी ‘निकनेम’ (टोपणनावे) आणि ‘सांकेतिक भाषेचा’ मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. या संभाषणांचा नेमका अर्थ काय? या कटात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे शोधण्यासाठी आरोपींची समोरासमोर आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसमोर बसवून चौकशी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी केली.

बचाव पक्षाचा प्रतिवाद: केवळ संशयावरून कोठडी नको

पोलिसांच्या या मागणीला सिया गोयलचे वकील ॲड. विपुल दूशिंग आणि इतर बचाव पक्ष वकिलांनी कडाडून विरोध केला. सिया गोयल तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहे आणि तिचा मोबाईल आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. केवळ मोबाईलमधील मेसेजचा अर्थ लावण्यासाठी किंवा कोडवर्डची पडताळणी करण्यासाठी पुन्हा पोलिस कोठडी मागणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. पोलिसांकडे कोठडी वाढवून मागण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसून, केवळ संशयाच्या आधारे कोठडी वाढवून देणे चुकीचे असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने न्यायालयात केला.

दोन्ही बाजूंचा सविस्तर आणि प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी अमान्य केली आणि सिया गोयल तसेच चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता या प्रकरणाचा तपास न्यायालयीन कोठडीतूनच पुढे जाणार आहे.

नार्को टेस्टबाबत न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींची ‘पॉलीग्राफ’ (लाई डिटेक्टर) चाचणी करण्याची परवानगी वडगाव मावळ न्यायालयाकडे मागितली होती. यावर न्यायाधीश ए. एम. विभुते यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आरोपींच्या कायदेशीर संमतीशिवाय नार्को टेस्टला परवानगी देता येणार नाही.” यावर, सध्या पोलिसांना नार्को टेस्टची कोणतीही आवश्यकता नसल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.

निर्जन टेकडीवर केली होती हत्येची तालीम

दरम्यान, कोणताही पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी पाठीमागे उरू नये आणि गुन्हा अगदी अचूकपणे पार पाडता यावा, यासाठी सिया आणि चेतन यांनी या हत्येचा कट रचून अनेकदा त्याची तालीम (रिहर्सल) केल्याची माहिती समोर आलेली आहे. बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील लुल्लानगर येथील एका निर्जन टेकडीवर हे दोघे नियमित भेटत असत. याच टेकडीवर चेतनने सियाला बाजूला ढकलण्याचा सराव केला होता. शुक्रवारी पोलिसांनी सियाला लुल्लानगर येथील त्याच टेकडीवर नेऊन गुन्ह्याच्या पूर्वतयारीचा माग काढला.

‘तो’ इशारा मिळताच केतनला दरीत ढकलले

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर गेल्यानंतर हत्येचा थरार घडला. जेव्हा केतन आणि सिया कड्याच्या टोकावर पोहोचले, तेव्हा ठरलेल्या प्लॅननुसार सिया कड्यावर खाली बसली. हाच तिचा चेतनसाठी ‘सिग्नल’ होता. सिया खाली बसताच पाठीमागून आलेल्या चेतनने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिले.

पोलिसांनी सियाच्या पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील घरातून घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणातील महत्त्वाचे तांत्रिक आणि डिजिटल पुरावे फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवले आहेत.

Ketan Agarwal Case: Siya Goyal & Chetan Chaudhary Sent to 14-Day Judicial Custody

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात