विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत नवऱ्याकडून होणाऱ्या लैंगिक छळात वाढ झाल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. कर्नाटकी भ्रतार सगळ्यात जास्त मारकुटे असून महाराष्ट्रातही बायकोला मारहाणीचे प्रकार वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. बायकोने लैंगिक संबंधांना नाही म्हटल्यावर मारहाणीचा सामना करावा लागतो, असे अहवालात दिसून आले आहे.In Karnataka, most of the husbands involved in sexual abuse of their wives, in Maharashtra also increasing incidents
२०१९ -२०२१ मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार प्रत्येक 25 पैकी एक महिला तिच्या पतीकडून होणाºया लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्याची नोंद झाली आहे. कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील नवरेही मारकुटे झाल्याचे या अहवालात दिसत आहेत.
सर्वेक्षणात १८ ते ४९ वयोगटातील विवाहित महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून हिंसाचार होतो का असे विचारण्यात आले. यामध्ये कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रात बायकोवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात २०१५-१६ अहवालात पतीकडून लैंगिक छळ होण्याचे प्रमाण १.७ टक्के होते. ते आता ४.८ टक्यांवर पोहोचले आहे.
बिहारमध्ये कदाचित दारूबंदीचा परिणाम म्हणून की काय परंतु महिलांच्या छळाचे प्रमाण कमी झाले आहे. पाच वर्षांपूर्वी १२.२ टक्यांवर असलेले प्रमाण आता ७.१ टक्यांवर आले आहे.
कर्नाटकात बायकोच्या छळाचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथील प्रत्येक दहापैकी एका विवाहितेला नवऱ्याच्या लैंगिक छळाला सामोरे जावे लागते. पश्चिम बंगाल (6.8 टक्के) आणि आसाम (6.1 टक्के) मध्ये अशी टक्केवारी आहे.
भारतीय कायदा वैवाहिक बलात्काराला गुन्हा मानत नाही. दिल्ली उच्च न्यायालयात सध्या लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत वैवाहिक बलात्काराच्या अपवादाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या संदर्भात सर्वेक्षण ठळकपणे दर्शविते की मोठ्या संख्येने महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो.
लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांनी नाही म्हणूनही त्यांच्या पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेल्याचे नोंदवले गेले. सुमारे 6 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांची इच्छा नसूनही नवऱ्याने त्यांना धमक्या आणि बळजबरी करून विशिष्ट लैंगिक कृत्ये करण्यास भाग पाडले. त्यासाठी मारहाणही केली.
शिक्षण, सशक्तीकरण आणि स्त्री-अनुकूल वातावरणामुळे सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात बोलण्याची आणि प्रतिकार करण्याची महिलांची ताकद वाढली आहे. त्यामुळेच या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App